Aarti Badade
कोंडा ही आजकाल खूप सामान्य समस्या बनली आहे. खाज येणे, केस गळणे आणि आत्मविश्वास कमी होणे यामागे कोंड्याचा मोठा वाटा असतो.
महागडे अँटी-डँड्रफ शॅम्पू काही वेळासाठी आराम देतात, पण कोंड्याचे मूळ कारण दूर करत नाहीत. उलट केस अजून अधिक गळायला लागतात.
रासायनिक शॅम्पूपेक्षा घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. ते टाळूचे आरोग्य सुधारतात आणि कोंड्याचा मुळापासून नाश करतात.
नारळ तेल केसांना पोषण देते, तर कापूर अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटकांनी खाज आणि कोंडा कमी करतो.
१ कापराची गोळी बारीक करून २-३ चमचे नारळ तेलात मिसळा. जास्त कापूर वापरल्यास त्वचेवर त्रास होऊ शकतो.
हे मिश्रण थोडंसं गरम करा, थंड झाल्यावर टाळूवर लावा. ३० मिनिटांपर्यंत किंवा रात्रभर ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.
कोंड्याची समस्या कमी होते, केस मजबूत होतात, खाज थांबते आणि केस अधिक दाट व चमकदार दिसतात.
या घरगुती उपायांमुळे केवळ तात्पुरता नव्हे, तर दीर्घकालीन फायदा मिळतो – तोही कोणत्याही रसायनांशिवाय!