Aarti Badade
प्रदूषण, खराब आहार आणि तणावामुळे केस गळती सामान्य झाली आहे.
घरातल्या उपायांनी केसांची काळजी घेता येते.
लवंग केस गळती थांबवते, टाळूचे आरोग्य सुधारते आणि केस मजबूत करते.
२ कप पाणी उकळवा,त्यात २ चमचे लवंग घाला,५-६ मिनिटे उकळा,३-४ तास किंवा रात्रभर तसेच ठेवा.
हे पाणी गाळून हवाबंद डब्यात ठेवा,शॅम्पूनंतर टाळू व केसांना लावा,हलक्या हाताने मसाज करा
१० मिनिटांनी केस धुवून नैसर्गिकरित्या वाळवा. परिणाम काही दिवसांत दिसून येतील.
लवंग वापरण्यापूर्वी त्वचेला सूट होते का याची चाचणी घ्या.
नियमित वापर केल्यास केस गळती कमी होते व केस अधिक घनदाट दिसतात.