Aarti Badade
मान्सूनमध्ये सर्दी, फ्लू, अन्नातून विषबाधा यांचा धोका वाढतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक!
पपई, बेरी यांसारखी फळं जीवनसत्त्व, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असतात. हे पचन सुधारतात आणि इम्युनिटी वाढवतात.
दही आणि ताक आतड्यांसाठी उत्तम. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीरातील विषाणूंशी लढायला मदत करतात.
उकळलेले आणि स्वच्छ पाणी प्या. सूप, हर्बल टी, नारळ पाणी हे इम्युनिटीसाठी फायदेशीर.
सूप, खिचडी, उकडलेल्या भाज्या यासारखा हलका आहार घ्या. तो पचायला सोपा आणि शरीरासाठी फायदेशीर असतो.
हळद, आले, काळी मिरी, तुळस हे नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर्स आहेत. रोजच्या आहारात यांचा वापर जरूर करा.
हिरव्या भाज्या (अतीशय धुतल्या शिवाय), तळलेले पदार्थ टाळा – हे पचन बिघडवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात.