Aarti Badade
आजकाल तरुणांपासून वृद्धांपर्यंत बरेच जण गुडघेदुखीने त्रस्त आहेत. औषधं उपयोगी पडत नाहीत? मग हा उपाय नक्की वाचा!
गुडघेदुखीवर ‘रेट्रो वॉकिंग’ (मागे चालणे) हा उपाय सुचवला आहे.
रेट्रो वॉकिंग म्हणजे उलट चालणे. ही एक प्रभावी आणि सुरक्षित चालण्याची पद्धत आहे, विशेषतः गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी.
गुडघ्याच्या पुढच्या भागातील वेदना, सुरुवातीचा ऑस्टिओआर्थरायटिस, किंवा दुखापतीतून बरे होत असलेल्यांसाठी हा व्यायाम अत्यंत फायदेशीर.
दिवसातून फक्त १०-१५ मिनिटे सपाट जागेवर हळूहळू मागे चाला. यामुळे सांध्यात लवचिकता येते आणि वेदना कमी होतात.
गुडघ्यावरील दाब कमी होतो
स्नायू सक्रिय होतात
सांधे अधिक लवचिक बनतात
निसरड्या जागेवर चालू नका.
वयोवृद्ध किंवा ज्यांना संतुलनाचा त्रास आहे त्यांनी आधाराशिवाय हा व्यायाम करू नये.
व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमितपणे रेट्रो वॉकिंग केल्यास गुडघेदुखीपासून खूप आराम मिळतो.