Aarti Badade
तोंडातील अल्सर खूप वेदनादायक असतात, ज्यामुळे खाणं आणि पिणं कठीण होऊ शकतं.
तोंडातील व्रणं पोटाच्या अस्वच्छतेमुळे किंवा उष्णतेमुळे होऊ शकतात, आणि हार्मोनल असंतुलन, दुखापत, किंवा मासिक पाळीमुळेही होऊ शकतात.
बाजारात तोंडातील अल्सर बरे करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, पण घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात.
आयुर्वेदात तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी अनेक पारंपारिक उपाय सांगितले आहेत.
निर्गुंडीचा वापर तोंडातील व्रण, दातांची समस्या आणि घसा खवखवणे दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
निर्गुंडीच्या पानांना उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाचे अल्सर लवकर बरे होतात.
निर्गुंडीला अमृतापेक्षा कमी नाही कारण ते तोंडाच्या इतर समस्या देखील दूर करते.