Ashok Jawale
अभिनेत्री सायली संजीव मनोरंजनविश्वात याच नावाने ओळखली जाते; मात्र तिच्या नावामागे एक भावनिक कारण आहे.
सायलीचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर आहे.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच तिने आडनावाऐवजी वडिलांचे नाव लावण्याचा निर्णय घेतला होता.
नावासोबत आडनाव पुकारले जाते, त्यामुळे ते आडनाव वडिलांचेच असावे, अशी तिची इच्छा होती.
‘मला आडनावाने बोलवायचे असेल, तर ते माझ्या वडिलांचे नाव असावे,’ असे सायलीने मुलाखतीत सांगितले.
तिच्या चित्रपटांच्या पुरस्कारांवरही ‘सायली संजीव’ हेच नाव लिहिले जाते.
सायलीचे वडील संजीव चांदसरकर यांच्याशी तिचे अतिशय जवळचे नाते होते.
२०२१ मध्ये कर्करोगामुळे वडिलांचे निधन झाले; मात्र त्यांचे नाव सायलीने आपल्या ओळखीचा कायमचा भाग बनवले.
India's top lawyer Harish Salve
Sakal