Anushka Tapshalkar
मे महिन्याची सुट्टी संपली असून शाळा पुन्हा सुरू होत आहेत. अशावेळी मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. यासाठीच आम्ही काही झटपट आणि सोप्या रेसिपीज घेऊन आलो आहोत.
ब्रेडला लोणी किंवा हिरवी चटणी लावा. काकडी, टोमॅटो, बीट किंवा गाजर भरून तयार करा हेल्दी सँडविच.
पातळ पोहे, दही, मीठ, साखर आणि कोथिंबीर मिसळा. मोहरी-जिऱ्याची फोडणी दिली की स्वादिष्ट दही पोहे तयार.
मोड आलेले मूग किंवा मटकी, कांदा, टोमॅटो, लिंबू आणि चाट मसाला घालून बनवा प्रथिनयुक्त चाट.
Sprouts Chaat
पोळीमध्ये पनीर, भाज्या आणि चटणी भरून रोल तयार करा. वेळ कमी असेल तर फक्त चीज स्प्रेड लावूनही बनवू शकता.
परतलेल्या कांदा-मिरचीत भिजवलेली थालीपीठ भाजणी घाला. मीठ-तिखट टाकून काही मिनिटांत पदार्थ तयार.
थोडं नियोजन आणि या झटपट रेसिपीजमुळे मुलांसाठी पौष्टिक, चविष्ट आणि पोटभर डबा ५ मिनिटांत तयार होईल
Lichi Capital of the World
sakal