ढगांमध्ये इतकं पाणी येतं कुठून? जाणून घ्या पावसामागचं विज्ञान!

Anushka Tapshalkar

पावसाची सुरुवात कुठून होते?

पावसाची खरी सुरुवात सूर्यापासून होते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव आणि सरोवरांतील पाणी गरम होऊन वाफेत बदलते.

Science Behind Rain

|

sakal

ढगांना पाणी फक्त समुद्रातूनच मिळतं का?

नाही! झाडेही त्यांच्या पानांतून पाण्याची वाफ सोडतात. त्यामुळे ढगांना पाणी समुद्राबरोबरच नद्या, तलाव, माती आणि वनस्पतींकडूनही मिळते.

Science Behind Rain

|

sakal

हवेत ढग कसे तयार होतात?

वरच्या थंड हवेत पोहोचल्यानंतर पाण्याची वाफ लहान पाण्याच्या थेंबांमध्ये किंवा बर्फाच्या कणांमध्ये बदलते. हेच थेंब एकत्र येऊन ढग तयार करतात.

Science Behind Rain

|

sakal

ढग हवेत तरंगतात कसे?

सुरुवातीला हे थेंब खूपच हलके असतात. त्यामुळे हवेचा दाब त्यांना खाली पडू देत नाही आणि ढग आकाशात सहज तरंगत राहतात.

Science Behind Rain

|

sakal

पाऊस पडतो कसा?

ढगांतील छोटे थेंब एकमेकांना धडकून मोठे होतात. थेंब जड झाल्यावर हवा त्यांना वर धरू शकत नाही आणि ते पावसाच्या रूपात जमिनीवर पडतात.

Science Behind Rain

|

sakal

ढगांना सर्वाधिक पाणी कुठून मिळतं?

शास्त्रज्ञांच्या मते, ढगांतील सुमारे 86% पाण्याची वाफ समुद्रातून येते, कारण पृथ्वीचा मोठा भाग पाण्याने व्यापलेला आहे.

Science Behind Rain

|

sakal

हा प्रवास कधीच थांबत नाही!

पावसाचं पाणी पुन्हा नद्या, तलाव आणि समुद्रात जाते. सूर्याच्या उष्णतेमुळे ते पुन्हा वाफ बनते. या अखंड प्रक्रियेला 'जलचक्र' (Water Cycle) म्हणतात.

Science Behind Rain

|

sakal

चंद्रावर झाडे उगवू शकतात का?

Can Plants Grow on the Moon

|

Sakal

आणखी वाचा