बापरे 500 टन! एवढा जड पाऊस ढगांना कसा झेपतो?

संतोष कानडे

ढगांचे वजन

एका सामान्य ढगामध्ये सुमारे ५ लाख किलोग्रॅम म्हणजे ५०० टन पाणी असते, जे एखाद्या मोठ्या विमानाइतके जड असते.

पाण्याचे थेंब

ढग म्हणजे पाण्याचा साठा नसूने ते पाण्याच्या अतिसूक्ष्म थेंबांचे बनलेले असतात, जे मानवी केसापेक्षाही हजार पटीने लहान असतात.

धूळ

हे थेंब इतके हलके आणि बारीक असतात की हवेतील धुलीकणांप्रमाणे ते आकाशात सहज तरंगत राहतात.

गरम हवा

सूर्यप्रकाशामुळे जमिनीलगतची हवा गरम होऊन वरच्या दिशेने वेगाने प्रवास करते, ज्याला 'अपड्राफ्ट' म्हणतात.

नैसर्गिक रश

हा खालून वर जाणारा गरम हवेचा प्रवाह ढगांमधील हलक्या थेंबांना सतत वर ढकलून धरतो आणि खाली पडू देत नाही.

घनता

ढगांमधील हवेची घनता ही त्याच्या खाली असलेल्या वातावरणातील हवेच्या घनतेपेक्षा कमी असते, त्यामुळे ढग हवेवर तरंगतात.

थेंब

जेव्हा ढग अधिक थंड हवेच्या संपर्कात येतात, तेव्हा हे लहान थेंब एकत्र येऊन त्यांचे रूपांतर मोठ्या थेंबांमध्ये होते.

वजन

ढगांमधील पाण्याचे थेंब जसे मोठे होतात, तसे खालून येणारा हवेचा प्रवाह त्यांचे वजन पेलण्यास असमर्थ ठरतो.

गुरुत्वाकर्षण

थेंब जास्त जड होताच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल प्रभावी ठरते आणि ते थेंब हवेत स्थिर राहू शकत नाहीत आणि पावसाच्या स्वरुपात जमिनीवर कोसळतात.

पाणी

ढगांमध्ये असलेलं पाणी एकत्र नसतं, ते मैलोन्मैल विखुरलेलं असतं. ढग म्हणजे पाण्याचा एखादा मोठा साठा किंवा पाण्याचा महाकाय फुगा नाही. कित्येक किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात अब्जावधी लहान थेंबांच्या रूपात हे पाणी असतं.

मुघलांच्या स्वयंपाकघरातील खास पदार्थ कोणते?

<strong>येथे क्लिक करा</strong>