डायनासोर संपले, पण झुरळ का संपलं नाही? अणुबॉम्बच्या स्फोटानंतरही जिवंतच!

संतोष कानडे

डायनासोर

झुरळे पृथ्वीवर सुमारे ३२ कोटी वर्षांपूर्वीपासून म्हणजेच डायनासोरचा जन्म होण्याच्या आधीपासून अस्तित्वात आहेत आणि आजही टिकून आहेत.

रेडिएशनची क्षमता

अणुबॉम्बच्या स्फोटातून निघणारे घातक किरणोत्सर्ग सहन करण्याची क्षमता झुरळांमध्ये मानवापेक्षा तब्बल १० ते १५ पटीने जास्त असते.

मृत्यू

हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुस्फोटात सर्व काही भस्मसात झाले, परंतु तिथल्या ढिगाऱ्यातही काही झुरळे जिवंत आढळली होती.

पेशी

मानवी शरीरातील पेशी सतत विभाजित होत असतात, त्यामुळे रेडिएशनचा आपल्यावर लगेच परिणाम होतो; मात्र झुरळांच्या पेशी केवळ आठवड्यातून एकदाच विभाजित होत असल्याने ते रेडिएशनपासून वाचतात.

पाण्याचा फुगा

झुरळ पाण्याचा एक थेंब न पिता २ आठवडे आणि काहीही न खाता तब्बल १ महिना उपाशी जिवंत राहू शकते.

अन्न

अन्न मिळाले नाही तर झुरळे कागद, चामडे, केसांचे तुकडे आणि अगदी स्वतःची मृत त्वचा खाऊनही स्वतःचे पोषण करू शकतात.

वेगवान हालचाल

संकट येताच झुरळे एका सेकंदात स्वतःच्या शरीराच्या लांबीपेक्षा ५० पटीने जास्त अंतर पळू शकतात, ज्यामुळे ते कोणत्याही आपत्तीतून लगेच लपतात.

रहस्य

वैज्ञानिक संशोधनानुसार, जर भविष्यात पृथ्वीवर तिसरे महायुद्ध झाले किंवा संपूर्ण मानवजात नष्ट झाली, तरी झुरळ हा जीव पृथ्वीवर कायम राज करेल.

पावसाचं पाणी ढगांना कसं झेपतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>