संतोष कानडे
या पृथ्वीवर असा प्राणी आहे जो चक्क डोळ्यातून लघवी करत असतो. हा प्राणी समुद्रामध्ये रहातो.
डोळ्यांतून लघवी करणारा प्राणी म्हणजे समुद्री कासव. हे कासव बघून अनेकांना वाटतं, ते रडतंय.. पण ते डोळ्यातून टाकावू पदार्थ बाहेर टाकत असतं.
समुद्री कासव जेव्हा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतं तेव्हा अनेकदा त्याच्या डोळ्यातून पांढरट, चिकट द्रव बाहेर पडतो.. हे शरीरातील जादा मिठ असतं.
समुद्री कासवांना जगण्यासाठी खरट पाणीच प्यावं लागतं. परंतु जास्तीचं मीठ त्याच्या रक्तात गेलं तर त्याचा जीव जाऊ शकतो.
त्यामुळे निसर्गाने या कासवांच्या डोळ्यांच्या मागे सॉल्ट ग्लँड्स नावाच्या ग्रंथी निर्माण केलेल्या आहेत. या ग्रंथी किडनीपेक्षा जास्त वेगाने रक्तातील मीठ ओढून घेतात.
मानवी शरीरामध्ये किडनीद्वारे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जादा क्षार फिल्टर करुन लघवीवाटे बाहेर टाकले जातात.
मात्र समुद्री कासवांची किडनी तेवढी शक्तिशाली नसते, त्यामुळे मीठ फिल्टर करण्याचं काम डोळ्यांद्वारे केलं जातं.
या प्रक्रियेला डोळ्यांतून होणारं उत्सर्जन किंवा सोप्या भाषेत डोळ्यांतून लघवी करणे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कासव जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर येतं तेव्हा हेच द्रव त्याच्या डोळ्यांना वाळू शिरण्यापासून वाचवतात आणि ओलावादेखील देतात.
Tiger