Saisimran Ghashi
अपघात झालेली गाडी डागडुजी करून विकली जाते. खरेदीपूर्वी काळजीपूर्वक तपासणी आवश्यक असते
गाडी तयार करताना लेझर/रिव्हेट सील असतात. अपघातानंतर ते निघतात आणि वेल्डिंग केलं जातं.
कोपऱ्यातील रिव्हेट सील तपासा. वेल्डिंगच्या खुणा किंवा वेगळ्या प्रकारचा रंग दिसतोय का चेक करा
रबरच्या आत रिव्हेट सील पाहा. कुठेही वेल्डिंग दिसतंय का चेक करा
स्पेअर व्हीलखालील रिव्हेट सील बघा. मुळात वेल्डिंग असेल तर ती अपघाताची खूण आहे.
बॉनेट उघडून फ्रेम तपासा. डेंट काढण्यासाठी हीट ट्रीटमेंट किंवा वेल्डिंग आहे का चेक करा
डॅशबोर्ड आणि विंडशील्डमध्ये गॅप आहे का? तपासा. हा गॅप असेल तर गाडी रिपेअर झालेली असू शकते.
प्री-ओन्ड कार घ्यायची असेल तर पूर्ण तपासणी करा. शंका असेल तर न घेतलेलीच बरी