Mansi Khambe
केदारनाथ मंदिर हे उत्तर भारतातील एक पवित्र तीर्थक्षेत्र असून ते मंदाकिनी नदीच्या काठावर, समुद्रसपाटीपासून ३,५८४ मीटर उंचीवर वसलेले आहे.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील 'चार धाम' आणि 'पंच केदार' यांचा एक भाग असून, ते भगवान शिवाच्या भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
महाभारतातील पांडवांनी बांधलेल्या या मंदिराची पुनर्बांधणी आठव्या शतकात आदिगुरू शंकराचार्यांनी केली आहे. सध्या या मंदिराचे १६६ वर्षांपूर्वीचे फोटो समोर आले आहेत.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
उत्तराखंडच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. त्यामुळे नेहमीच या मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येते.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
केदारनाथ मंदिर हे वास्तुकलेचा एक उत्तम आणि अद्भुत नमुना असून हे मंदिर सुंदर आणि नेत्रदीपक पद्धतीने बांधण्यात आले आहे. केदारनाथ मंदिर सहा फूट उंचीच्या चौकोनी व्यासपीठावर अस्लर शैलीमध्ये बांधले आहे.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
सध्या केदारनाथ यात्रा करण्यासाठी रस्ते, हेलिकॉप्टर आणि सुधारित व्यवस्थांमुळे प्रवास सोपा झाला आहे. मात्र १८८२ साली केदारनाथला जाणे सोपे नव्हते.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
थंड हवामान, खडबडीत रस्ते आणि बर्फाच्छादित प्रदेशातून भक्त चालत येत. यावेळी पक्के रस्ते किंवा कसल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हा प्रवास शरीर आणि मनाची परीक्षा घेणारा ठरत होता.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
पौराणिक कथेनुसार, देवतांनी राक्षसांपासून वाचण्यासाठी भगवान शिवाची मदत घेतली. यावेळी भगवान शिव यांनी बैलाचे रूप धारण केले असून त्याचे नाव ‘कोडाराम’ होते.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
कोडाराम बैलाने असुरांचा शिंगे आणि खुरांनी नाश केला, त्यानंतर भगवान शिवाने त्यांना मंदाकिनी नदीत फेकून दिले. यामुळेच कोडाराम बैलावरून या मंदिराला केदारनाथ असे नाव पडल्याचे सांगण्यात येते.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल 'सकाळ' कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
Kedarnath Temple 166 years old photos
ESakal
Karmic Consequences of Mahapap
esakal