Monika Shinde
हे केवळ स्वतःला सुंदर म्हणणं नाही, तर खऱ्या अर्थाने स्वतःची साथ देणं आहे.
इतरांसाठी वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ देतो का? मन, शरीर, आणि आत्म्यासाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं.
स्वतःच्या मनाविरुद्ध फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी होकार देणं थांबवा. स्वतःच्या भावनांना प्राधान्य द्या.
तुमचा प्रवास तुमचाच आहे. इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना न करता स्वतःचा सन्मान करा.
स्वतःवर राग ठेवणं थांबवा. चुका सगळ्यांकडून होतात स्वतःला माफ करून पुढे चला.
नवीन गोष्टी शिकणं, स्वतःला पुढे नेत राहणं हे स्वतःवर प्रेम करण्याचंच लक्षण आहे.