सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता आसते. त्यामुळे या ऋतुमध्ये आपल्या आरोग्याची अधीक काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासुन दूर राहायचे आसेल तर तिळ खाणेखाणे आवश्यक मानले जाते.
पावसाळ्यात तिळीचे सेवन केल्यास कोणते आजार दूर राहतात जाणून घ्या.
तिळीचे सेवन हाडांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात, जे हाडांना मजबूत करतात.
तीळात असलेले नैसर्गिक तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. तसेच ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
तिळ त्वचेसाठी चांगले असते, त्वचेला पोषण देते आणि तिळात तेल असल्याने त्वचेची चमक वाढवते.
तिळ दातांना मजबूत करते आणि दात स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
तीळ पचनास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पोटाचे विकार टाळता येतात.
पावसाळ्यात तीळ खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत आहारात तीळ समाविष्ट करावे.