Aarti Badade
मंगळवारी अपराजिता फुलं हनुमानाला अर्पण करून ॐ हून हनुमते नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे शत्रूंवरील अडथळे दूर होतात.
बुधवारी भगवान गणेशाची पूजा करताना अपराजिता फुलांचा समावेश करा. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि व्यवसायात प्रगती मिळते.
नवरात्रीत किंवा इतर पूजांमध्ये माँ दुर्गेला ताजी अपराजिता फुले अर्पण करा. यामुळे संकटातून मुक्ती मिळते आणि इच्छित कार्य पूर्ण होते.
शनिवारी शनिदेवाला अपराजिता फुले अर्पण केल्यास साडेसाती, धैय्या आणि राहू-केतू दोष कमी होतो.
मुख्य दरवाज्यावर अपराजिता मूळ लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात प्रेम, समाधान वाढते.
अपराजिता काढा नियमित घेतल्यास तणाव, अनिद्रा दूर होते. त्वचेचा नूर वाढतो आणि मन प्रसन्न राहते.
हे फूल देवी-देवतांना प्रिय मानले गेले आहे. फुले आणि मुळे दोन्ही शुभ मानले जातात. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते आणि जीवनात यश प्राप्त होते.