पृथ्वीवरच्या सात खंडांचं वेगळेपणे काय? तुम्हाला कुठे जायला आवडेल?

संतोष कानडे

सात खंड

पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत. त्या सातही खंडांचं वेगळेपण आहे आणि नाना तऱ्हेची वैशिष्ट्ये आहेत.

युरोप

युरोप हा खंड ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे इतिहासासोबत कला आणि विविध संस्कृती आहेत.

ऑस्ट्रेलिया

हा सगळ्यात लहान खंड असला तरी वेगळं महत्व प्राप्त झालेला भाग आहे. नैसर्गिक विविधतेने नटलेला हा खंड आहे. समुद्र, जंगल या खंडाचं वैशिष्ट्य.

आशिया

आशिया हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असेलला खंड आहे. प्राचीन संस्कृती, भाषा, परंपरा आणि नैसर्गिक सौदर्य यात आहे.

उत्तर अमेरिका

हा उत्तर अमेरिका खंड गोठलेल्या टुंड्रापासून ते उष्णकटिबंधीय समुद्रकिनार्यांपर्यंत, गजबजलेल्या शहरांपासून ते विशाल राष्ट्रीय उद्यानांपर्यंत विविध भूभागांनी नटलेला भाग आहे.

दक्षिण अमेरिका

या खंडात अमॅझॉन आहे. तसेच जगातलं सगळ्यात मोठं पर्जन्यवन इथं आहे. सोबत अँडीज पर्वतरांगेसारख्या सर्वात लांब पर्वत रांगा आहेत.

आफ्रिका

आफ्रिका जंगलासाखी ओळखला जातो. त्यामुळे वन्यजीवन अफाट आहे. सहारा वाळवंट, नाईल नदी याच खंडातून वहाते.

अंटार्क्टिका

हा खंड पूर्णपणे बर्फाने अच्छादलेला आहे. पृथ्वीच्या दक्षिण भागामध्ये हा खंड येतो. येथे वैज्ञानिक आपलं संशोधनकार्य करतात.

फॉरेन ट्रिपसाठी हे सहा देश आहेत बजेट फ्रेंडला

येथे क्लिक करा