सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या सात नंदीध्वज याबद्दल माहिती आहे का?

Monika Shinde

सात नंदीध्वज

सोलापुरात सर्व धर्मसंभावाचं प्रतीक असणारे श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मनाच्या सात नंदीध्वजाची माहिती जाणून घ्या

पहिला नंदीध्वज

पहिला नंदीध्वज हा २७ फुटाचा असतो. हा नंदीध्वज देवस्थानचा असून हिरेहब्बू मानकरी यांचे आहेत. तर भक्तांकडून खारीक- खोबर यासोबत नागफणी आणि बाशिंग बांधण्याचा मान आहे.

दुसरा नंदीध्वज

दुसरा नंदीध्वज हा २७.५ फुटाचा असतो. आणि देशमुख कुटूंबाचा नंदीध्वज आहे.

तिसरा नंदीध्वज

तिसरा नंदीध्वज २८ फुटाचा असतो. या नंदीध्वजाचे मानकरी हे माळी समाज आहेत.

चौथा नंदीध्वज

चौथा नंदीध्वज हा २८.५ फुटाचा असतो. तर या नंदीध्वजाचे मानकरी हे श्री विश्वब्राम्हण समाज कालिका मंदिर सेवा मंडळ ट्रस्ट आहेत.

पाचवा नंदीध्वज

पाचवा नंदीध्वज हा २९ फुटाचा असतो. तर या नंदीध्वजाचे मानकरी सोनार समाज आहेत.

सहावा नंदीध्वज

सहावा नंदीध्वज हा २९.५ फुटाचा असतो. याचे मानकरी मातंग समाज आहेत

सातवा नंदीध्वज

सातवा नंदीध्वज हा ३० फुटाचा असतो. विशेष म्हणजे सहावा आणि सातवा नंदीध्वजाचे मानकरी हे मातंग समाज आणि बनसोडे कुटुंब आहेत.

हिवाळ्यात हुरडा खाण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या

आणखी वाचा