Anushka Tapshalkar
भगवान हनुमान हा शक्ती, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक असून दररोज हनुमान मंत्र जप केल्याने मानसिक बळ, आत्मविश्वास आणि संकटांवर मात करण्याची शक्ती वाढते.
मी श्री हनुमानाचे स्मरण करतो आणि त्यांना नमस्कार करतो.
श्रीरामाचा सेवक आणि दूत असलेल्या श्रीहनुमानाला मी वंदन करतो.
अंजनीच्या पोटी जन्माला आलेल्या, प्रभू श्रीरामाला प्रिय असलेल्या हनुमानाला माझा नमस्कार. तू सदैव माझे रक्षण कर.
वज्रासारखे शरीर असलेल्या, प्रभू रामाचा भक्त आणि वायुपुत्र अशा श्री हनुमानाला माझा नमस्कार.
आम्ही अंजनीपुत्र आणि वायुपुत्र हनुमानाचे ध्यान करतो. तोच आम्हाला सद्बुद्धी देवो.
अंजनीपुत्र, महाबलशाली हनुमानाला मी वंदन करतो आणि त्याच्या चरणी स्वतःला समर्पित करतो.
हे हनुमाना, या कठीण प्रसंगी मला तुझीच साथ हवी आहे. माझं दु:ख दूर करायला तूच समर्थ आहेस, म्हणून संपूर्ण विश्वासाने मी तुझ्याकडेच धाव घेत आहे.