सकाळ डिजिटल टीम
जर रक्तदाब अचानक वाढला किंवा कमी झाला, तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत.
मानसिक ताण आणि चिंता शरीरात हार्मोनल बदल घडवून आणतात, ज्यामुळे तात्पुरता रक्तदाब वाढू शकतो.
हृदयाशी संबंधित आजार जसे की, Coronary Artery Disease, हृदयविकाराचा झटका यामुळे रक्तदाबात बदल होऊ शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
थायरॉईड, गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल रक्तदाबावर परिणाम करू शकतात.
काही औषधे जसे की, डाययुरेटिक्स, बीटा-ब्लॉकर्स आणि अँटीडिप्रेसेंट्स रक्तदाब कमी करू शकतात, तर काही स्टिरॉइड्स, गर्भनिरोधक गोळ्या रक्तदाब वाढवू शकतात.
मीठ, तळलेले पदार्थ, चरबी आणि साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो.
रक्तात जास्त द्रवपदार्थ साठून राहिल्याने मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.