होर्मुझच्या सामुद्रधुनीतले इराणचे ७ ‘शिलेदार’; या बेटांबद्दल तुम्हाला माहितीय का?

सूरज यादव

होर्मुझ

इराण युद्धाचा केंद्रबिंदू आता इराणच्या अणुकार्यक्रमावरून होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे सरकला आहे. इराणने या सामुद्रधुनीची कोंडी केल्यापासून जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

Hormuz islands

|

Esakal

विमानवाहू नौका

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणची सात बेटे आहेत. मोक्याचे स्थान आणि इराणकडून त्याचा होणारा सामरिक वापर यांमुळे ही बेटे तरंगणाऱ्या विमानवाहू नौका म्हणून ओळखली जातात.

Hormuz islands

|

Esakal

सात बेटांचे महत्त्व

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे सोपे जाते. या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना या बेटांमधूनच प्रवास करावा लागतो. इराणने धावपट्ट्या तयार केल्यामुळे बेटांना लष्करी महत्त्व आहे.

Hormuz islands

|

Esakal

शस्त्रास्त्रे तैनात

लाराक (४९ चौरस किलोमीटर) रशियन बनावटीची दळणवळण बंद पाडणारी यंत्रणा आणि जहाजविरोधी शस्त्रास्त्रे या बेटावर तैनात आहेत.इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डकडून जहाजांचे नियमन करण्यासाठी या बेटाचा वापर केला जातो.

Hormuz islands

|

Esakal

नियंत्रण

क्वेशम (१४४२ चौरस किलोमीटर) पर्शियाच्या आखातातील हे सर्वांत मोठे बेट आहे. भूमिगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि इंधनाशी संबंधित पायाभूत सुविधा आहेत. होर्मुझच्या नियंत्रणासाठी हे महत्त्वाचे बेट आहे.

Hormuz islands

|

Esakal

टेहळणी

होर्मुझ (४२ चौरस किलोमीटर) आणि हेंगम (३३ चौरस किलोमीटर) लाराक बेट आणि इराणच्या मुख्य भूमीदरम्यान असणारी ही बेटे आहेत. आकाराने लहान असली तरी टेहळणीसाठी मोक्याचे स्थान आहेत.

Hormuz islands

|

Esakal

विमानतळ

अबु मुसा(११.६ चौरस किलोमीटर) या बेटावर विमानतळ, बंदर, वीज केंद्र, जलशुद्धीकरण अशा सुविधा आहेत. इराणपेक्षा संयुक्त अरब अमिराती जवळ असल्यामुळे सामरिक महत्त्व जास्त आहे.

Hormuz islands

|

Esakal

इराणचे डोळे

ग्रेटर टुन्ब (१० चौरस किलोमीटर) आणि लेसर टुन्ब (१ चौरस किलोमीटर) या दोन बेटांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणचे डोळे म्हणून ओळखलं जातं. सागरी मार्गापासून ही सर्वात जवळची ठिकाणं आहेत.

Hormuz islands

|

Esakal

कोण आहेत IAS तुकाराम मुंढेंचे भाऊ? होते डेप्युटी कलेक्टर

tukaram mundhe with brother

|

Esakal

इथं क्लिक करा