सकाळ डिजिटल टीम
तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली झाल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. दरम्यान, त्यांच्या मातोश्री आसराबाई यांचं निधन झालं.
tukaram mundhe mother
Esakal
आईच्या अंत्यसंस्कारावेळी तुकाराम मुंढे हे त्यांचे निवृत्त असलेले बंधू माजी डेप्युटी कलेक्टर अशोक मुंढे यांच्यासोबत अश्रूंना वाट मोकळी करताना दिसले.
tukaram mundhe
Esakal
आसराबाई यांनी संघर्षातून मुलांना शिकवलं. त्यांची दोन मुलं सरकारी अधिकारी तर एक प्राध्यापक झाले. बीडमधील ताडसोनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिकले.
tukaram mundhe
Esakal
अशोक मुंढे हे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते सध्या समाजकार्य करतात.
tukaram mundhe with brother
Esakal
आयएएस तुकाराम मुंढे यांनी प्राथमिक शाळेत इंग्रजी कच्चं होतं तेव्हा आपल्याला अशोक दादांनीच इंग्रजी शिकवलं आणि मार्गदर्शन केल्याचं म्हटलं होतं.
tukaram mundhe
Esakal
तुकाराम मुंढे यांना जिल्हाधिकारी म्हणजे काय, आयएएस कसं बनतात याचं स्वप्नही अशोक मुंढे यांनीच दाखवलं. मोठा भाऊ कमी वडिलांचीच भूमिका ते पार पाडतात.
tukaram mundhe
Esakal
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थि विसर्जन पाण्यात न करता वृक्षारोपण करत नवा आदर्श निर्माण केलाय.
tukaram mundhe
Esakal
Aga Khan Palace Pune history
Sakal