Aarti Badade
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात.या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी या प्रकारच्या बेरी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.या अन्नघटकांमुळे शरीरातील दाह (inflammation) कमी होतो आणि हृदयाचे संरक्षण होते.
बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्यांमध्ये निरोगी चरबी असते.ही चरबी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यास चालना देते.
ओट्स हे फायबरने समृद्ध असून ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यात उपयुक्त आहेत.दररोज ओट्स खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे हृदयासाठी उपयुक्त असतात.हे फळ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय बळकट करते.
संत्रे, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळं अँटीऑक्सिडंट्स व फायबरने भरलेली असतात.ही फळं हृदयाच्या पेशींचे रक्षण करतात व शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात.
साल्मन, टूना यांसारखे मासे किंवा ओमेगा-३ फॅटी अॅसिड सप्लिमेंट्स हृदयासाठी फायदेशीर आहेत.हे रक्तातील चरबीचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.