Aarti Badade
पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे शिलाँग हे हिल स्टेशन जोडप्यांसाठी एक हनिमून डेस्टिनेशन आहे.
शहराच्या गोंगाटापासून दूर, शिलाँगमध्ये आल्हाददायक हवामान, हिरवळ, आणि मनमोहक निसर्ग दृश्ये प्रेमळ क्षणांसाठी अनुकूल आहेत.
मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हे शिलाँगला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने आहेत – हवामान थंड आणि सौंदर्य मनोहारी!
टेकड्यांनी वेढलेला हा तलाव बोटिंगसाठी अत्यंत सुंदर आहे. रोमँटिक वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम!
शिलाँगचा प्रसिद्ध धबधबा – एलिफंट फॉल्स, जोडप्यांसाठी शांत आणि सुंदर क्षणांसाठी योग्य ठिकाण.
शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी शिलाँग शिखर आणि लैटलम कॅन्यन हे उत्तम पर्याय आहेत.
शहराच्या मध्यभागी वसलेला कृत्रिम तलाव जोडप्यांसाठी एक आरामदायक ठिकाण आहे.
डेव्हिड स्कॉट ट्रेल आणि लैटलम कॅन्यनसारखे ट्रेकिंग मार्ग रोमँटिक वॉक आणि साहसी अनुभव देतात.
पोलिस बाजारमधील स्थानिक हस्तकला आणि कपड्यांची खरेदी तुमच्या ट्रिपला खास बनवते.
कॅफे शिलाँग आणि रेड डाइनसारख्या ठिकाणी एकत्र वेळ घालवत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या!
शिलाँग हे निसर्ग, शांतता आणि रोमँटिक अनुभवांनी परिपूर्ण असे ठिकाण आहे – हनिमूनसाठी उत्तम निवड!