Aarti Badade
रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेल लावून हलकासा मसाज केल्याने मेंदू शांत होतो आणि झोप चांगली लागते.
तेल लावून केलेल्या मसाजमुळे थकवा दूर होतो, स्नायू सैलावतात आणि शरीराला आराम मिळतो.
पायांच्या तळव्यांना नियमित तेल लावल्यास रक्तप्रवाह सुधारतो, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
मोहरीसारख्या उष्णतेच्या तेलांमुळे शरीराचे तापमान वाढते, विशेषतः थंड हवामानात हा उपाय उपयुक्त ठरतो.
तळपायांची मसाज मन शांत करते, स्ट्रेस कमी करते आणि मानसिक आरोग्य सुधारते.
तेल लावल्याने पायांच्या तळव्यांची त्वचा मऊ, मुलायम व पोषक राहते. कोरडेपणा दूर होतो.
काशाच्या वाटीने मसाज केल्यास शरीरातील वात आणि उष्णता संतुलित राहते, विशेषतः संधिवात आणि अंगदुखी कमी होते.
तिळाचे तेल: त्वचेची जळजळ कमी करते, थकवा दूर करते. खोबरेल तेल: थंडीत त्वचेला पोषण देते, थंडावा देते. मोहरीचे तेल: शरीर गरम ठेवते, स्नायूदुखीवर फायदेशीर.
मसाज करताना हलका दाब द्या आणि नेहमी स्वच्छ, विश्रांत स्थितीत मसाज करा.