अंगठ्यातील तीव्र वेदना दुर्लक्षित करू नका; ‘हा’ आजार कारणीभूत तर नाही?

Aarti Badade

युरिक ॲसिड म्हणजे काय?

शरीरात अन्न पचताना तयार होणाऱ्या प्युरिन घटकांमुळे युरिक ॲसिड तयार होते. हे ॲसिड सांध्यांमध्ये साचल्यास तीव्र वेदना आणि सूज येते.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

ही महाभयंकर लक्षणे ओळखा

पायाच्या अंगठ्यात अचानक तीव्र वेदना होणे, टाच किंवा गुडघ्याला सूज येणे आणि सकाळी उठल्यावर सांधे आखडणे ही युरिक ॲसिड वाढल्याची मुख्य लक्षणे आहेत.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

वाढीची मुख्य कारणे

जास्त प्रमाणात मांसाहार, मद्यपान, जंक फूडचे सेवन, पाणी कमी पिणे आणि वाढलेले वजन यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी बिघडते.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

अंगठ्यातील वेदना का होते?

जेव्हा युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडत नाही, तेव्हा त्याचे बारीक स्फटिक (Crystals) सांध्यांमध्ये, विशेषतः पायाच्या अंगठ्यात साचतात, ज्याला 'गाऊट' असेही म्हणतात.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal 

पाण्याचे महत्त्व

युरिक ॲसिड शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी दिवसभरात किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी कमी पिल्याने हा त्रास अधिक बळावतो.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

आहारात करा 'हे' बदल

मांसाहार आणि तेलकट पदार्थ टाळून आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि ताकाचा समावेश करा. यामुळे सांधेदुखीवर नियंत्रण मिळवता येते.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

व्यायामाची जोड द्या

नियमित चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांमध्ये साचलेले घटक कमी होण्यास मदत होते.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास किडनी स्टोन किंवा सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेदना जाणवल्यास त्वरित रक्ततपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

किडनी फेल होण्यामागे बीपी की शुगर? जास्त धोका कोणाकडून?

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

येथे क्लिक करा