सकाळ वृत्तसेवा
शहाजहानची मुलगी जहाँआरा हिने आपल्या डायरीमध्ये हरमच्या संबंधाने लिहिलेलं आहे.
हरममध्ये मुलींना आणलं जायचं आणि पुन्हा त्यांना बाहेर जाऊ दिलं जायचं नाही. जगासाठी त्या गायब व्हायच्या.
जहाँआरा ही १२ वर्षांची असताना तिने डायरी लिहायला सुरुवात केली होती. त्यात तिने शहाजहां बादशहा बनण्यापूर्वी आणि त्यानंतरचा काळ विस्ताराने लिहिला आहे.
बादशहाच्या महलामध्ये महिलांचं एक वेगळंच जग असायचं. येथे राणी, शहजाद्या, दास्या, बावर्चिन, नर्तकी, गायिका धोबी आणि चित्रकार महिला असायच्या.
जहाँआरा आपल्या डायरीमध्ये लिहिते, बाहेरुन आणलेल्या तरुणींवर नजर ठेवण्यासाठी दासींच्या फौजा असायच्या. ज्या प्रत्येक क्षणाची वार्ता बादशहापर्यंत पोहच करीत.
शाही कुटुंबातील सदस्यासोबत लग्न केल्यानंतर महिला हरममध्ये यायच्या. काही महिलांवर बादशहा फिदा असायचा, त्यामुळे आत यायच्या.
हरममधल्या काही महिलांना शहदाजाद्यांनी ठेवलेलं असायचं. एकदा त्या आतमध्ये आल्या की पुन्हा कधीच बाहेर जायच्या नाहीत.
जहाँआरा लिहिते, आतमध्ये असलेल्या काही महिलांचा जन्मच मुळात हरममध्ये झालेला होता. हरममधल्या महिलांचा चेहरा बाहेरच्या पुरुषाच्या नजरेस कधीच पडत नसे.
हरममधल्या महिला जगासाठी मेलेल्या असत. काही दिवसांनंतर त्यांच्या घरचेसुद्धा त्यांचा चेहरा विसरुन जात असत.
जहाँआरा हिला त्याकाळी सगळ्यात ताकदवान आणि समृद्ध महिला मानलं जायचं. जेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा ती १७ वर्षांची होती.
जहाँआरा १७ वर्षांची असतानाच मुघल साम्राज्याच्या हरमचा पूर्ण कारभार तिच्या खांद्यावर होता. तिने दिल्लीत अनेक महल बांधले, चांदणी चौक तिने निर्माण केला होता.