Shubham Banubakode
शाहजहानला तीन मुली होत्या. जहांआरा, रोशनआरा आणि गौहरआरा, त्याने या तिन्ही मुलींची लग्नं होऊ दिली नाहीत. यामागे सत्तेचं गणित होतं
Mughal succession politics
esakal
मुघल घराण्यात गादीसाठी भावांमध्ये संघर्ष व्हायचा. त्यामुळे भविष्यातील दावेदारांची संख्या कमी ठेवणं शाहजहानला महत्त्वाचं वाटत होतं.
Mughal succession politics
esakal
मुलींची लग्नं झाली असती, तर त्यांच्या पोटीही राजघराण्यातील मुलं जन्माला आली असती. पुढे हेच मुलं गादीवर दावा करू शकली असती.
Mughal succession politics
esakal
मुघल साम्राज्यात मोठा मुलगाच पुढचा बादशाह होईल, असा ठोस नियम नव्हता. त्यामुळे प्रत्येक राजपुत्रासाठी गादी मिळवण्याची संधी होती.
Mughal succession politics
esakal
लग्न झालं नाही म्हणून शाहजहानने आपल्या मुलींना घरातच बसवलं नाही. उलट, त्यांना राजकारणात सक्रिय होण्याची संधी दिली.
Mughal succession politics
esakal
शाहजहानची लाडकी मुलगी जहांआरा दारा शिकोहच्या बाजूने होती. शाहजहानचाही दारावर मोठा विश्वास होता आणि तो त्याला पुढचा बादशाह मानत होता.
Mughal succession politics
esakal
दुसरीकडे रोशनआरा औरंगजेबाच्या जवळ होती. सत्तेसाठी भावांमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर तिने औरंगजेबाला महत्त्वाची साथ दिली.
Mughal succession politics
esakal
गौहरआराने मुरादचा पक्ष घेतला. म्हणजे लग्न झालं नसलं, तरी शाहजहानच्या तिन्ही मुली राजकारणात सक्रिय होत्या.
Mughal succession politics
esakal
para
esakal