kimaya narayan
बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे शाहरुख खान. शाहरुख कायमच चर्चेत असतो.
शाहरुख हा भारतातील गाजलेल्या आघाडीच्या सुपरस्टारपैकी एक आहे. रोमँटिक अभिनेता म्हणूनही त्याची ओळख आहे.
शाहरुख एकूण 7,300 करोड रुपयांचा मालक आहे. भारतात आणि भारताबाहेरही त्यांची घर आणि मालकीची संपत्ती आहे. याशिवाय अनेक व्यवसायांमध्येही त्याची गुंतवणूक आहे.
शाहरुखने वांद्रे पश्चिम येथे मन्नत बंगला विकत घेतला त्याची किंमत आता 200 करोड रुपये आहे. पण तुम्हाला माहितीये का ? शाहरुखला स्वतःच्याच घरी फोनवर बोलण्याची बंदी आहे.
शाहरुखच्या घरी कुणीच मोबाईलवर बोलू शकत नाही. घरी आल्यावर प्रत्येकाला फोन बंद करावा लागतो. हा नियम त्याने स्वतःच बनवला आहे.
घरी आल्यावर घरातील सदस्यांना वेळ देता यावा म्हणून हा नियम शाहरुख आणि गौरीने मिळून हा नियम बनवला आहे.
शाहरुखच्या या बंगल्याची किंमत आता 200 करोड रुपये आहे. शाहरुखने हा बंगला 2001मध्ये 13 करोडला विकत घेतला होता.
शाहरुख किंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात त्याची मुलगी सुहानासुद्धा दिसणार आहे.