Mayur Ratnaparkhe
शाहरुख खान हा केवळ एक सुपरस्टार नाही, तर त्याचे स्टारडम ही त्याच्या सर्व चाहत्यांसाठी एक प्रेरणा आहे.
२०२५ मध्ये जगातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवणारा हा मेगास्टार आता एकमेव बॉलीवूड अभिनेता बनला आहे.
इतकेच नाही तर श्रीमंत अभिनेत्यांच्या या प्रतिष्ठित यादीत शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर आहे.
मागील पाच वर्षांत शाहरुख खानच्या एकूण संपत्ती ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार २०२५ पर्यंत शाहरुख खानची एकूण संपत्ती ८७६.५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४३८ कोटी रुपयांच्या समतुल्य आहे.
२०२० मध्ये त्याच्या एकूण संपत्तीपेक्षा ही एक आश्चर्यकारक वाढ आहे, जी सुमारे ६०० मिलियन डॉलर म्हणजेच ५००० कोटी रुपयांच्या समतुल्य होती.
शाहरूख खानची एकूण संपत्ती प्रामुख्याने त्याच्या चित्रपटांमधून, जाहिरातींमधून, विविध उद्योजकीय उपक्रमांमधून आणि गुंतवणुकीतून येते.
शाहरूखच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग त्याची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज आणि त्याची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स यासारख्या त्याच्या व्यावसायिक उपक्रमांमधून येतो.
याशिवाय शाहरूख खान हा काही मोठ्या ब्रँडचा चेहरा देखील बनलेला आहे.