'या' दिग्दर्शकाच्या शैलीतून शाहरुखने म्हटलाय 'क..क...किरण' हा गाजलेला डायलॉग

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा गाजलेला एक सिनेमा म्हणजे डर.

Shah Rukh Khan

डर सिनेमा

जुही चावला, सनी देओल आणि शाहरुख खान यांची 'डर' या सिनेमात मुख्य भूमिका होती. या सिनेमात शाहरुखने साकारलेल्या सणकी व्यक्तीची भूमिका गाजली होती.

Shah Rukh Khan

गाजलेला संवाद

शाहरुखचा या सिनेमातील 'क...क...किरण' डायलॉग खूप गाजला होता. पण तुम्हाला माहितीये का ? शाहरुखने हा डायलॉग म्हणण्याची शैली बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून उचलली आहे.

Shah Rukh Khan

जुहीने सांगितलं किस्सा

अभिनेत्री जुही चावलाने एका मुलाखतीमध्ये हा किस्सा शेअर केला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा हे बोलताना हे अडखळायचे.

Shah Rukh Khan

शाहरुखने केली ही गोष्ट

शाहरुखने ही गोष्ट नोटीस केली आणि त्याने जुहीला सांगितलं कि, कधी ना कधी तो हे वापरणार आहे. त्याने ही गोष्ट 'डर' या सिनेमात वापरली आणि हा संवाद चांगलाच गाजला.

Shah Rukh Khan

लोकप्रिय डायलॉग

शाहरुखचा हा डायलॉग आजही लोकप्रिय आहे.

Shah Rukh Khan