Sandip Kapde
बंगळुरूमध्ये पहाटे भूपाळ्यांचे मधुर स्वर आणि मंत्रपठण ऐकून शहाजी महाराज दिवसाची सुरुवात करत असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
प्रातर्विधी पूर्ण केल्यानंतर ते वाड्यासमोरील मैदानातील घोडेस्वारांच्या कवायतीचे निरीक्षण करत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
सुमारे हजार ते पंधराशे घोडेस्वारांची शिस्तबद्ध कवायत पाहणे हा त्यांच्या दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग होता.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
कवायत पाहिल्यानंतर ते वैद्याकडून नाडीपरीक्षा करून आपल्या आरोग्याची काळजी घेत असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
स्नान आटोपल्यानंतर ते दरबारात जाण्यासाठी पूर्ण तयारी करत असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
सभामंडपाला नवगजी म्हटले जात असे आणि तेथे राजे, संस्थानिक, परराष्ट्र वकील व सरदार आधीच उपस्थित असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
भालदारांच्या ललकारीत हातातील तलवारीचे अग्र जमिनीला टेकवत शहाजी महाराज सिंहासनाकडे प्रस्थान करत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
सिंहासनारूढ झाल्यानंतर ते राज्यकारभार, न्यायनिवाडा आणि विविध प्रशासकीय कामांवर लक्ष देत असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
भोजनानंतर कधी स्वारी तर कधी शिकारीसाठी जाऊन ते आपल्या युद्धकौशल्याचा सराव करत असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
पंडित आणि कारभाऱ्यांसोबत ते राजकारण, न्याय, काव्य आणि विनोद यांवरही चर्चा करत असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
सायंकाळची पूजा आणि उपहार झाल्यानंतर मोजक्या मुत्सद्यांसह खलबतखान्यात गुप्त चर्चा आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
शहाजी महाराजांची संपूर्ण दिनचर्या शिस्त, दूरदृष्टी, प्रशासनकौशल्य आणि पराक्रम यांचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते.
Shahaji Maharaj's Daily Routine
esakal
Shivaji Maharaj Military Camp Facts
esakal