सकाळ वृत्तसेवा
ऐशोआराम, व्यभिचार.. या गोष्टींशिवाय मुघलांचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही.
त्यात हे मुघल बादशहा कामोत्तेजनेसाठी काय खायचे, काय प्यायचे.. याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत.
मुघल बादशहा शहाजहानचा मृत्यू हा कामवासना वाढवण्यासाठीच्या औषधांमुळे झाल्याचं म्हटलं जातं.
इटालियन प्रवाशी मनूची याने याबाबत लिहून ठेवलेलं आहे. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी शहाजहान कामोत्तेजक औषधं घ्यायचा.
या औषधांमुळे शहाजहानला युरिनरी डिसऑर्डर झालं. या आजाराला स्टैंगरी या नावानेही ओळखलं जातं.
या आजारामध्ये रुग्णाला सातत्याने लघवीला जावं लागतं. याशिवाय लघवीचा विचित्र वास येतो. शिवाय युरिनच्या वेळी अस्वस्थ होतं.
या आजारामुळे शहाजहांचा मृत्यू झाल्याचा दावा इतिहासकार करतात. उतारवयात शहाजहांला अनेक कष्ट सोसावे लागले होते.
मुमताज महल या त्याच्या आवडत्या पत्नीसाठी त्याने आग्र्यात ताजमहल बांधला. त्यामुळे त्याचं नाव अजरामर झालं होतं.
मुघल सम्राट बाबरच्या काळापासून हरम ही प्रथा सुरु झाली होती. येथे महिलांना ठेवलं जात असे.
पुढे अकबराने हरमचा विस्तार केला. त्याच्या हरममध्ये पाच हजार स्त्रीया होत्या, असं सांगितलं जातं.