संतोष कानडे
ताजमहल बांधल्यामुळे अजरामर झालेला मुघल बादशहा शाहजहांचे किस्से आजही चर्चिले जातात
काही ऐतिहासिक माहितीनुसार, मुघल बादशहा बुधवारी पांढरे कपडे घालत होता, आयुष्यभर त्याने हा नियम जपला.
त्याचं कारण होतं मुमताज. मुमताजवर शाहजहांचं निस्सीम प्रेम होतं. तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असे.
मृत्यूपर्वी मुमताज महलने दिलेल्या वचनामुळे त्याने कधीच स्त्रीसंग केला नाही. शिवाय आयुष्यभर पांढरे कपडे नेसले.
मुमताज महलचा मृत्यू बुधवारच्या दिवशी झाला होता. त्यामुळे शाहजहांने प्रत्येक बुधवारी पांढरे कपडे घातले.
मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या होत्या. अचानक त्याची दाढी पांढरी झाली होती.
डोळे कमजोर झाले त्यामुळे त्याने चष्मा वापरण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी खास हिऱ्यांचा चष्मा घडवला होता.
मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहांने दरबारामध्ये येणंदेखील सोडून दिलेलं होतं. इतिहासकार इनायत खानाने याबद्दल लिहून ठेवलं आहे.