Saisimran Ghashi
शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही पोस्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की गौरीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
चला तर जाणून घेऊया व्हायरल पोस्टमागे नेमके सत्य काय आहे. खरच गौरी खानने धर्मांतर केलय काय?
हे दावे कोणत्याही विश्वासार्ह स्त्रोतांवर आधारित नाहीत. हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून बनवण्यात आले आहेत.
शाहरुख खान आणि गौरी खानने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
गौरी खान मूळची हिंदू धर्मीय आहे. शाहरुख खान आणि गौरीने 1991 साली हिंदू परंपरेने लग्न केले होते.
त्यांच्या कुटुंबात सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. दोघांचेही मुलं, आर्यन, सुहाना, आणि अबराम, दोन्ही धर्मांचे पालन करतात.
व्हायरल दावा सत्य असल्याचा कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नाही. हे फोटो कृत्रिम बुद्धीमत्ता वापरुन बनवले गेले आहेत.