Shahu Maharaj Ganesh Festival : शाहू महाराजांच्या काळात गणेशोत्सव होता का?, कसे होते स्वरूप

Sandeep Shirguppe

शाहू महाराजांच्या काळात गणेशोत्सव

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कोल्हापुरात गणेशोत्सवाची परंपरा होती. मात्र त्याचे स्वरूप आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा वेगळे होते.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

करवीर संस्थानचा उत्सव

करवीर संस्थानच्या वतीने गणेश चतुर्थीला विविध ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असे.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

राजवाड्यात बाप्पाची प्रतिष्ठापना

जुन्या राजवाड्यातील दौलतखाना, तुळजाभवानी मंदिर, नवा राजवाडा आणि पंचगंगा नदीकाठावरील संस्थान शिवसागर येथे गणेशमूर्ती बसवल्या जात.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

लवाजम्यासह बाप्पाचे आगमन

गणेशमूर्तींचे आगमन पालखी, भोई, भालदार, चोपदार आणि मानकऱ्यांच्या लवाजम्यासह होत असे.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

छत्रपतींच्या हस्ते पूजन

छत्रपतींच्या हस्ते गणेशपूजन झाल्यानंतर शाहू वैदिक शाळेतील राजोपाध्यायांकडून प्रतिष्ठापना आणि नित्य पूजा केली जात असे.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

राजेशाही परंपरेची झलक

गणेशोत्सवात धार्मिक विधींबरोबरच करवीर संस्थानच्या परंपरा आणि राजेशाही वैभवाची झलक पाहायला मिळत असे.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

आजच्या मंडळांसारखा उत्सव नव्हता

आजच्या धर्तीवर मोठे मंडप, सार्वजनिक गणेश मंडळे आणि भव्य मिरवणुकांचे स्वरूप त्यावेळी नव्हते. कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव पुढील काळात विकसित झाला.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

परंपरा जुनी, स्वरूप नवे

शाहू महाराजांच्या काळात गणेशोत्सव होता, हे स्पष्ट आहे. मात्र आजचा भव्य सार्वजनिक गणेशोत्सव हा नंतरच्या काळात विकसित झालेला प्रकार आहे.

chatrapati Shahu Maharaj Ganesh Festival

|

esakal

आणखी पाहा...