Pranali Kodre
टी२० क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामुळे विविध देशात टी२० च्या लीगही सुरू झाल्या.
सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान एक अनोखा विक्रम झाल्याचे पाहायला मिळाले.
बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये खेळताना मोठा विक्रम केला आहे.
तो अँटिग्वा अँडबार्बुडा फालकॉन्स संघाकडून खेळत असून २४ ऑगस्टला त्याने सेंट किट्स अँड नेव्हिज पॅट्रिओट्सविरुद्ध खेळताना ३ विकेट्स घेतल्या आणि २५ धावा केल्या.
त्यामुळे त्याने टी२० कारकिर्दीत ५०० विकेट्सचा टप्पा पार केला.
यामुळेच शाकिब अल हसन आता टी२० क्रिकेटमध्ये ७००० हून अधिक धावा आणि ५०० हून अधिक विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू बनला आहे. त्याच्याव्यतिरिक्त अजून असा कारनामा कोणी केलेला नाही.
शाकिबने त्याच्या टी२० कारकिर्दीत ४५७ सामने खेळले असून ७५७४ धावा केल्या आहेत आणि ५०२ विकेट्स घेतल्या आहेत.