Pranali Kodre
चेतेश्वर पुजारा म्हटलं की पटकन डोळ्यासमोर तो पांढऱ्या जर्सीतला खेळाडू येतो ना! खरंतर गेली १५ वर्षे आपण पुजाराला टेस्ट स्पेशालिस्ट म्हणूनच ओळखतो, त्यामुळे त्यात काही चूक नाही.
पुजारा भारताचा जवळपास १० वर्षे कसोटीतील आधारस्तंभ होता. त्याने तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. तो त्याच्या संयमी खेळासाठीही ओळखला जातो.
पण , तुम्हाला माहित आहे का चेतेश्वर पुजाराने टी२० मध्येही एक शतक केलंय.
पुजारा टेस्ट स्पेशालिस्ट असला तरी त्याने ७१ टी२० मॅच खेळल्यात आणि पंधराशेहून जास्त रन्सही केल्यात. तसेच एक शतकही केलंय, तेही १६३ च्या स्ट्राईक रेटने.
त्याने हे टी२० शतक केलेलं २०१९ मध्ये झालेल्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये.
भारताच्या या देशांतर्गत टी२० स्पर्धेत पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना रेल्वेविरुद्ध ६१ चेंडूंमध्ये १०० धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने १४ चौकार आणि १ षटकारही मारला होता.
पण नंतर हा सामना सौराष्ट हरला. पण तरी सामना चर्चेत राहिला, तो पुजाराच्या या शतकामुळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.