M TV प्रेझेंटर अन् विवस्त्र शेन वॉर्न! फिरकीच्या बादशाहचे का गेले होते उपकर्णधारपद?

अनिरुद्ध संकपाळ

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने आजच म्हणजे 4 मार्च 2022 ला या जगाचा निरोप घेतला होता. थायंलडमधील एका व्हिलामध्ये त्याचा गुढ मृत्यू झाला होता.

शेन वॉर्न जसा आपल्या फिरकीसाठी जगप्रसिद्ध होता तसाच तो आपल्या लाईफ स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध होता. त्याच्या या लाईफस्टाईलचे अनेक किस्से गाजले आहेत.

शेन वॉर्न हा 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार होता. यादरम्यानच ब्रिटीश मॅगझिनमध्ये शेन वॉर्नच्या काही कारनाम्यांचे फोटो झळकले होते.

एमटीव्ही प्रेजेंटर कॉरेली इचोल्ट्ज आणि एम्मा यांच्यासोबत बिना कपड्यांचा शेन वॉर्न असे हे फोटो होते. या फोटोमुळे शेन वॉर्नचे उपकर्णधारपद गेले होते.

शेन वॉर्न मुलींसोबत नको त्या अवस्थेत सापडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. मात्र क्रिकेटच्या मैदानावरील वॉर्नच्या ग्रेटनेसवर याचा कधी परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही.

ब्रिटीश - ऑस्ट्रेलियन पत्रकार पॉल बेरी यांनी 2006 मध्ये स्पून आऊट या आपल्या पुस्तकात शेन वॉर्नचे तब्बल 1000 महिलांसोबत शारिरीक संबंध असल्याचा दावा केला होता.

100 क्लबमध्ये अश्विनही; कसोटी सामन्यांचे शतक ठोकणारे हे आहेत 14 खेळाडू