Aarti Badade
ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष ग्रहांच्या स्थितीमुळे अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. शनी, राहू आणि केतू या तिन्ही ग्रहांची प्रतिकूल स्थिती काही राशींसाठी अडचणीची ठरू शकते.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
२०२६ मध्ये शनी 'मीन' राशीत, राहू 'कुंभ' राशीत तर केतू 'सिंह' राशीत असणार आहे. अनेक वर्षांनंतर येणारा हा ग्रहांचा संयोग जागतिक आणि वैयक्तिक स्तरावर मोठे फेरबदल घडवू शकतो.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
सिंह राशीच्या लोकांसाठी २०२६ मध्ये केतू याच राशीत विराजमान असेल. यामुळे मानसिक अस्वस्थता आणि विनाकारण भीती वाटण्याची शक्यता आहे. जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कष्ट करूनही फळ उशिरा मिळाल्याने निराशा येऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि वादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
कुंभ राशीसाठी हे वर्ष सर्वात जास्त आव्हानात्मक असेल. शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच राहू याच राशीत मुक्कामाला असेल, ज्यामुळे मोठे फेरबदल होतील.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
शनी-राहूच्या संयोगामुळे भ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
कुंभ राशीच्या जातकांनी प्रवासात विशेष काळजी घ्यावी. अचानक ओढवलेल्या संकटामुळे नियोजित कामे लांबणीवर पडू शकतात. वेगाने वाहन चालवणे टाळावे.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या, हनुमानाची उपासना करा आणि गरिबांना मदत करा. संयम आणि सकारात्मकता हाच या काळातील यशाचा मंत्र आहे.
Horoscope 2026 राशीभविष्य
Sakal
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal