Varsha Balhe
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात शनि शिंगणापूर नावाचं एक गाव आहे. या गावाची एक खास गोष्ट आहे. इथल्या अनेक घरांना दरवाजे नाहीत आणि लोक घरांना कुलूपही लावत नाहीत.
No Door Village
esakal
या गावातील लोकांची शनिदेवावर खूप श्रद्धा आहे. शनिदेवच गावाचं रक्षण करतात, अशी त्यांची मान्यता आहे. त्यामुळे गावात चोरी होत नाही, असा अनेकांचा विश्वास आहे.
No Door Village
esakal
या गावातील अनेक घरांना मुख्य दरवाजे नाहीत. काही घरांमध्ये दरवाजांच्या जागी फक्त पडदे लावलेले असतात. त्यामुळे घरात सहज ये-जा करता येते.
No Door Village
esakal
या गावात यूको बँकेची शाखाही आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या या बँकेची सुरुवातीला कुलूप न लावणारी बँक म्हणून विशेष चर्चा झाली होती. बँकेच्या प्रवेशद्वाराला काचेचा दरवाजा असला तरी त्याला कुलूप लावलं जात नव्हतं.
No Door Village
esakal
गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की, शनि शिंगणापूरमध्ये चोरी करणाऱ्याला शनिदेव शिक्षा देतात. त्यामुळे लोक घरांना कुलूप लावत नाहीत.
No Door Village
esakal
शनि शिंगणापूरची ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. मात्र, बदलत्या काळानुसार काही ठिकाणी सुरक्षेसाठी दरवाजे आणि कुलूप लावण्याकडेही लोकांचा कल वाढत आहे.
No Door Village
esakal
Old Cinema Theatres in India
esakal