सकाळ डिजिटल टीम
शार्दूल ठाकूरने मुंबईचे प्रतिनिधित्व करताना रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या पर्वात ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईला अनेक सामन्यात त्याने फलंदाजीतूनही तारले आहे. या पर्वात शतकासह त्याने ४०२ धावा केल्या आहेत.
शार्दूल ठाकूर २०२३ पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि तो पुनरागमनासाठी जोर लावतोय.
शार्दूल ठाकूरने ११ कसोटी, ४७ वन डे व २५ ट्वेंटी-२० सामन्यांत १३० विकेट्स घेतल्या आहेत.
शार्दूल आयपीएल २०२५च्या लिलावात २ कोटींच्या मुळ किंमतीतही अनसोल्ड राहिला होता.
शार्दूलला बीसीसीआय वार्षिक कराराच्या क गटात ठेवले आहे आणि त्याला १ कोटी पगार मिळतो.
BCCI कडून रणजी करंडक स्पर्धेसाठी एक सामन्यात अडीच लाख दिले जातात
रणजीच्या यंदाच्या पर्वात शार्दूल ठाकूरला जवळपास १९.८० लाख रुपये मिळाले आहेत.
मुंबई क्रिेकेट असोसिएशननेही खेळाडूंना मॅच फी देण्यास सुरुवात केल्याने शार्दूलला इथूनही १९ लाख मिळाले.