सकाळ डिजिटल टीम
शेअर बाजारात गुंतवणूक करतांना कोणती काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.
Share Market Tips
sakal
अनेकजण मित्र, नातेवाईक किंवा सोशल मीडियावरील 'टिप्स' वाचून पैसे गुंतवतात. शेअर मार्केट हा अभ्यासाचा विषय आहे, केवळ ऐकीव माहितीवर पैसे लावणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे.
Share Market Tips
sakal
तुमचा सर्व पैसा एकाच कंपनीत किंवा एकाच सेक्टरमध्ये (उदा. फक्त आयटी किंवा फक्त बँकिंग) गुंतवू नका. जर तो सेक्टर कोसळला, तर तुमचे मोठे नुकसान होईल. तुमचा पोर्टफोलिओ डाइव्हर्सिफाय (Diversify) ठेवा.
Share Market Tips
sakal
शेअर मार्केटमध्ये रातोरात पैसे दुप्पट होत नाहीत. "पेनी स्टॉक्स" (खूप कमी किमतीचे शेअर्स) मध्ये झटपट नफ्यासाठी पैसे लावणे धोक्याचे ठरू शकते. चांगल्या आणि स्थिर कंपन्या निवडा.
Share Market Tips
sakal
शेअर बाजार कधीही स्थिर नसतो. त्यामुळे कधीही कोणाकडून कर्ज काढून किंवा उधारीवर गुंतवणूक करू नका. बाजारात घसरण झाल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.
Share Market Tips
sakal
शेअर मार्केटमध्ये खरा पैसा दीर्घकालीन गुंतवणुकीत (Long-term investment) असतो. ट्रेडिंग करून झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेकजण मूळ भांडवल गमावून बसतात.
Share Market Tips
sakal
ट्रेडिंग करताना 'स्टॉप लॉस' लावणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शेअरची किंमत एका मर्यादेपेक्षा जास्त पडल्यास तुमची पोझिशन आपोआप बंद होते आणि मोठे नुकसान टळते.
Share Market Tips
sakal
एखाद्या शेअरने गेल्या वर्षी खूप चांगला परतावा दिला म्हणजे तो यावर्षीही देईलच असे नाही. भविष्यातील व्यवसायाची संधी ओळखून गुंतवणूक करा.
Share Market Tips
sakal
मिळलेला नफा लगेच खर्च करण्यापेक्षा तो पुन्हा योग्य ठिकाणी गुंतवल्यास 'कंपाउंडिंग'चा (Compounding) फायदा मिळतो, जो दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करतो.
Share Market Tips
sakal
Railway Budget History
ESakal