पार्टनरसोबत टॉवेल शेअर करताय? सावधान! आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

Aarti Badade

टॉवेल शेअर करणे एक धोकादायक सवय

जोडीदारासोबत टॉवेल शेअर करणे सामान्य आहे. पण ही सवय नकळतपणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका

ओलाव्यामुळे टॉवेलमध्ये बॅक्टेरिया, बुरशी (Fungi) वाढ होते. टॉवेल शेअर केल्यास त्वचेचे बॅक्टेरिया किंवा दाद (Ringworm) यांसारखे संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतात.

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

त्वचेचे संक्रमण आणि पुरळ

टॉवेल तेल आणि घाम शोषून घेतात. यामुळे जंतूंची संख्या वाढते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ (Rashes) आणि इतर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

विषाणूजन्य संसर्गाचा धोका

मस्से (HPV) किंवा नागीण (Herpes) यांसारखे काही विषाणूजन्य संसर्ग टॉवेलद्वारे पसरू शकतात. विशेषतः जर टॉवेल संवेदनशील भागांवर वापरला गेला तर धोका वाढतो.

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

ऍलर्जी आणि त्वचेची संवेदनशीलता

तुमच्या जोडीदाराच्या साबण किंवा क्रीमच्या संपर्कामुळे तुमच्या त्वचेवर ऍलर्जी, पुरळ किंवा खाज येण्याची शक्यता असते, कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते.

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

स्वच्छतेचा अभाव (Unhygienic)

एकच टॉवेल अनेक लोक वापरत असल्यामुळे तो लवकर घाण होतो आणि जंतूंची संख्या वाढते. ओला टॉवेल २४ तासांतच बॅक्टेरियाचे घर बनू शकतो.

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

निरोगी राहण्यासाठी काय करावे?

प्रत्येकाने स्वतःचा टॉवेल वापरावा, तो नियमित धुवावा आणि सूर्यप्रकाशात चांगला वाळवावा. निरोगी राहण्यासाठी ही सवय लगेच बदला!

health risks of sharing a towel with your partner

|

Sakal

कोणत्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?

Vitamins You Need to Maintain Natural Hair Color

|

Sakal

येथे क्लिक करा