Apurva Kulkarni
अभिनेता शंशाक केतकर सध्या मुरांबा मालिकेतून घराघरात पोहचला आहे. मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
दरम्यान राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शशांकने त्याच्या जवळच्या व्यक्तीबद्दल भाष्य केलय.
मुलाखतीत त्याला मनोरंजन विश्वातील मित्र कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर शशांकने उत्तर देत म्हटलं की, 'ज्यांनी मला साथ दिली अशा मित्राचं नाव घ्यायचं झालं तर ती आहे अनुजा साठे. ती माझी खूप जवळची मैत्रिण आहे.'
'ती नेहमीच माझ्यासाठी उभी राहते. ओंकार कुलकर्णी हा सुद्धा माझा जवळचा मित्र आहे.'
पुढे बोलताना शशांक म्हणाला की, 'पण या सगळ्यात बायको ही माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. मी तिच्यासोबत वाट्टेल ते शेअर करु शकतो.'
दरम्यान शशांक बद्दल बोलायचं झालं तर, होणार सून मी या घरची मालिकेतून तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने अनेक मालिका सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.
सध्या शंशाक केतकर मुरंबा मालिकेत अक्षयच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. सध्या मालिकेत लीप घेण्यात आल्याने प्रेक्षकांची मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.