Anuradha Vipat
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा नुकतेचं पोहोचले होते.
यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला.
पत्नी पूनम यांच्या आईने शत्रुघ्न सिन्हा यांचं स्थळ स्पष्टपणे नाकारलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं
पुढे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की ,पूनम यांनी माझ्याकडून प्रपोज करवून घेतलं.
यासोबतच त्यांनी अभिनेते धर्मेंद्र यांनी दिलेला एक मजेशीर सल्ला सांगितला.
ते म्हणाले की, धर्मेंद्र यांनी मला एकदा सांगितलं होतं की, हे बघ.. तू या फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. तुझ्यासाठी अनेक मुली वेड्या आहेत. तू नेहमी एका वेळी ‘वन-वुमन मॅन’ राहा