kimaya narayan
अभिनेत्री शेफाली जरीवाला ही हिंदी इंडस्ट्रीमधील नावाजलेली अभिनेत्री आणि मॉडेल.
काल तिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मृत्यूसमयी तिचं वय 42 वर्षं होतं.
कांटा लगा या गाण्यामुळे शेफालीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने काही सिनेमांमध्येही काम केलं. बिग बॉस 13 मध्ये ती सहभागी झाली होती.
अतिशय यशस्वी करिअर तिने इंडस्ट्रीमध्ये निर्माण केलं. स्वतःची एक वेगळी ओळख तिने निर्माण केली.
पण शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या डॉक्टरांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तरुण दिसण्यासाठी काही औषधं शेफाली नियमितपणे घेत होती असं डॉक्टर म्हणाले.
व्हिटॅमिन सी आणि Glutathione ही औषध ती घेत होती. गेली अनेक वर्षं ती ही औषध देत होती.
त्या औषधांचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही असं डॉक्टर म्हणाले. पण काल शेफालीची तब्येत बिघडल्याचा खुलासा तिच्या नवऱ्याने केला आहे
शेफालीच्या घरी पूजा होती त्यानंतर तिची तब्येत बिघडली. अचानक तिचं ब्लडप्रेशर वाढलं. औषध घेऊनही काही फरक पडला नाही आणि ती बेशुद्ध पडली. हॉस्पिटलला घेऊन गेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आलं.
तिच्या निधनावर बॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.