महाराष्ट्रातल्या 'या' गावात प्रत्येक घरात पाळला जातो साप

संतोष कानडे

शेटफळ

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ गाव ‘नागोबाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे.

नागांची पूजा

गावात अनेक वर्षांपासून नागांची पूजा करण्याची परंपरा असून, या श्रद्धेमुळे सापांना मारण्याऐवजी त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवली जाते.

देवस्थान

पारंपरिक घरांमध्ये नागांसाठी स्वतंत्र जागा किंवा कोनाडा तयार केला जातो; या जागेला स्थानिक पातळीवर ‘देवस्थान’ म्हटले जाते.

साप

साप घरात आला तर त्याला पाहुणा किंवा कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्वीकारण्याची स्थानिक परंपरा असल्याचे विविध वृत्तांत सांगतात.

नाग किंवा कोब्रा

या गावात प्रामुख्याने नाग किंवा कोब्रा आढळतात आणि साप-माणूस सहअस्तित्वाची ही परंपरा गावाची खास ओळख बनली आहे.

सावधगिरी

लहान मुलांना लहानपणापासून सापांची भीती न बाळगता त्यांच्यापासून सुरक्षित अंतर आणि सावधगिरी कशी ठेवायची, याची जाणीव करून दिली जाते.

दुर्मीळ

मुलं सापांच्या जवळ वावरताना किंवा त्यांच्यासोबत खेळताना दिसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेटफळमध्ये साप चावल्याच्या घटना अत्यंत दुर्मीळ आहेत.

अतिविषारी नाग

इतकंच नाही तर काही घरांमध्ये अतिविषारी नागही पाळले जातात आणि हे सर्व साप घरातील सदस्यांसोबत राहतात.

पाळीव प्राणी

विशेष म्हणजे गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप फिरत असतात. अनेक लोक मोठ्या कुतूहलाने या अनोख्या गावाला भेट देतात.

मुघल बादशहा हरममधील स्त्रीयांना कसे छळायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>