Varsha Balhe
शेवग्याच्या शेंगांची भाजी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण तुम्ही कधी शेवग्याच्या पानांची चटणी खाल्ली आहे का? ही चटणी चवीला झणझणीत असून झटपट तयार होते.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
एक वाटी शेवग्याची पाने, २-३ चमचे हरभरा डाळ, २ चमचे शेंगदाणे आणि ३-४ लाल मिरच्या घ्या. यासोबत लसूण, कढीपत्ता, जिरे, धने, चिंच, मीठ आणि थोडी हळद घ्या.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
कढईत थोडं तेल गरम करून त्यात हरभरा डाळ आणि शेंगदाणे घाला. त्यात धने-जिरे टाकून सगळं खमंग भाजून घ्या.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
आता त्यात लसूण, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घाला. हे मिश्रण थोडं परतून घेतलं की चटणीला छान चव येते.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
आता स्वच्छ धुतलेली शेवग्याची पाने कढईत टाका. त्यात हिंग, मीठ आणि थोडी चिंच किंवा आमचूर पावडर घाला.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
सगळं मिश्रण मंद आचेवर काही मिनिटं परतून घ्या. पानांचा कच्चेपणा जाईपर्यंत ते व्यवस्थित शिजू द्या.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
परतलेलं मिश्रण एका ताटात काढून थोडं थंड होऊ द्या. गरम असतानाच मिक्सरमध्ये वाटू नका.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
मिश्रण मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. तयार झालेली चटणी भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत खाऊ शकता.
MORINGA LEAVES CHUTNEY RECIPE
esakal
banana and ghee benefits
Sakal