गब्बरचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ही कामगिरी करणारा धवन पहिलाच

प्रणाली कोद्रे

पंजाब किंग्सचा विजय

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने 4 विकेट्सने विजय मिळवला.

Shikhar Dhawan - Rishabh Pant | X/IPL

गब्बरचा विक्रम

या सामन्यादरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Shikhar Dhawan | X/IPL

शिखर धवनची खेळी

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखरने 16 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा केल्या.

Shikhar Dhawan | X/IPL

900 बाऊंड्री

दरम्यान, त्याने 4 चौकार मारल्याने आयपीएलमध्ये 900 बाऊंड्री (चौकार आणि षटकार) पूर्ण करण्याचा टप्पा पूर्ण केला.

Shikhar Dhawan | X/IPL

पहिला क्रिकेटपटू

शिखर आयपीएलमध्ये 900 पेक्षा अधिक बाऊंड्री मारणारा पहिलाच क्रिकेटपटू आहे.

Shikhar Dhawan | X/IPL

शिखरच्या बाऊंड्री

शिखरने 23 मार्च 2024 पर्यंत आयपीएलमध्ये 754 चौकार आणि 148 षटकार असे मिळून 902 बाऊंड्री मारल्या आहेत.

Shikhar Dhawan | X/IPL

दुसरा क्रमांक

त्याच्यापाठोपाठ या यादीत विराट कोहली असून तोही या विक्रमाच्या जवळ आहे. विराटने 898 बाऊंड्री मारल्या आहेत. त्यामुळे त्यालाही आयपीएलमध्ये 900 बाऊंड्रीचा टप्पा गाठण्याची संधी आहे.

Virat Kohli | X/RCBTweet

CSK vs RCB: जबरदस्त कॅच अन् तुफानी बॅटिंग, रचिन रविंद्रने गाजवलं IPL पदार्पण

Rachin Ravindra | X/ChennaiIPL